दौंड : महान्यूज लाईव्ह
आतापर्यंत दौंडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नव्हता. दौंडकरांनी मेहनतीने कोरोना रोखला होता. मात्र आज दौंड तालुक्याच्या नावाने कोरोनाची नोंद झाली. दौंड तालुक्यातील एका ज्येष्ठ पुरूष रुग्णास कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले असून या रुग्णावर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत.
पुणे जिल्ह्यात इंदापूर व दौंड हे तालुके कोरोनामुक्त तालुके म्हणून गणले जात होते. मात्र काल (ता.२८) इंदापूर तालुक्यात भिगवण स्टेशनमध्ये एक रुग्ण आढळल्यानंतर इंदापूर तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले. आज दौंडसाठी देखील नकारात्मक बातमी आली आहे. राहू प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील दहिटणे गावातील पुरूष रुग्णास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.










