इंदापूर : सुरेश मिसाळ
हिंदु – मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले ह. चाँदशहावली बाबा देवस्थान येथील 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न काल वीरश्री मालोजीराजे ग्रुपचे संस्थापक प्रदीप जामदार यांनी काल(ता.30) स्वखर्चाने बोअर घेवून मिटवला.
या दर्गा चा पुजेचा मान इंदापुरचे सरदार वीरश्री मालोजीराजे भोसले यांचा होता. त्यानंतरच्या काळात व स्वातंत्र्योत्तर काळात दरवर्षी उरुसाचा पहिला मान इंदापुर पोलिस ठाण्याला देण्यात आला.
या दर्ग्यात पाणी टंचाई जाणवत होती. वीरश्री मालोजीराजे ग्रुपचे इंदापूर चे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जामदार यांनी स्वखर्चाने मंदिराचे जागेत म्हणजेच कसब्यातील चाँदतारा मश्जीदी समोर स्वखर्चाने बोअर घेतले. आता मंदिरामधे येणाऱ्या सर्व भाविकांना पाय धुण्यासाठी लागणारी पाण्याची टाकी, वीज पंप, जलवाहिन्या यासाठी लागणारा खर्च प्रदीप जामदार हे उचलणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी मंदिराचे पुजारी जाफरभाई मुजावर, माजी उपनगराध्यक्ष रशीद पठाण, प्रदीप जामदार, मयूर ढावरे, माजी नगरसेवक इब्राहिम बाबा शेख, सेवेकरी विठु बानकर, अनिल चव्हाण, आझाद पठाण, शकील मुजावर, संकल्प मानव सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष संतोष जामदार, महादेव चव्हाण सर, प्रभाकर मखरे , जाकीर भाई पठाण, अनिल परदेशी, नितीन (पिनु) जामदार , ललेंद्र शिंदे, लहुजी वस्ताद ग्रुपचे संजय खंडाळे, एकनाथ जाधव तसेच कसबा भागातील नागरीक उपस्थित होते.
. त्यामुळे भाविक भक्तांना पाय धुण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची सोय झाली आहे.त्यामुळे शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.











