दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्याला बुधवारी रात्री पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.सकाळी सुरू झालेला पावसाची सतंधर मध्यरात्री पर्यंत सुरू होती. या पावसामुळे तालुक्यात जीवीत हानीसह शेतपिकांची हानी झाले आहे. ग्रामिण भागातील जनजीवन पुर्ण पणे विस्कळीत झाले आहे. तालुक्यात सुमारे 812 मिलीमिटर पाऊस झाला असून सर्वात जास्त पाऊस रावणगाव मंडलक्षेत्रात झाल्याची नोंद शासकीय दरबारी आहे.
दौड तालुक्यात पावसाने अक्षरक्षा तांडव घातले होते. पुणे सोलापूर महामार्गावरील गावांना या पावसाने चांगले झोडपले आहे. तालुक्यात सर्व भागात मुसळधार पाऊस झाला आहे. तालुक्यात यवत येथे 74 मिमी, पाटस 100 मिमी, केडगाव 91 मिमी, देऊळगाव राजे 140 मिमी, रावणगाव 157 मिमी, वरवंड 95 मिमी, दौंड 87 मिमी आणि राहु 68 मिमी इतका पाऊस झाला आहे. तालुक्यात एकुण 812 मिटर पाऊस झाल्याची नोंद तहसील कार्यालयात झाली आहे.
दरम्यान, या पावसाने राजेगाव ते खानवटे या रस्त्यावरून प्रवास करणारी दोन दुचाकीसह चार जण वाहून गेले, यात एका महिलेसह तीन जणांचा मृत्युदेह सापडला असून एक जण बेपत्ता आहे. त्याचा अद्यापही शोध लागला नाही. तसेच तालुक्यातील मळद, पाटस, वरवंड, पडवी यासह अनेक गावांतील रस्त्यावरील ओढयाचे पुल वाहुन गेले आहेत. तर अनेक शेतकारांचे पाळीव जनावरे ही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
ओढ्यालगतच्या शेतकरांच्या शेतात पाणी शिरल्याने तलावाचे स्वरूप आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतात पाणी शिरल्याने उभी शेत पिके जमीनदोस्त झाली आहे.तर अनेक ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. यापावसात शेतकरांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले झाले. सबंधित नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.











