इंदापूर : महान्युज लाईव्ह
सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील अनेक वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या 22 हजार 500 कर्मचाऱ्यांचे वेतन किमान वेतनावर आणण्याचा शासनाने निर्णय घेतला.
आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी 22 हजार 500 कंत्राटी कामगारांना दिलासा दिला. कंत्राटी कर्मचारी संघटनेने सहा महिन्यापूर्वी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपले म्हणणे व मागण्या मांडल्या होत्या. त्या वेळी भरणे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आरोग्य मंत्र्यांशी भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते, त्यानंतर त्यानुसार त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या समवेत एक बैठकही घडवून आणली आणि यासंदर्भातील निर्णयाला मुहूर्त मिळावा यासाठी प्रयत्न केले.
त्यानुसार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी डॉक्टर परिचारिका, प्रयोगशाळेमध्ये काम करणारे तंत्रज्ञ आदी 22 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची तरतूद करून 253 कोटींचा त्यांचा आजवरचा फरकही देण्याचे मान्य केले व तशी तरतूद करून हा मार्ग मोकळा केला.
त्यामुळे कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात काम करण्याचा आमचा आजवरचा प्रयत्न यशस्वी झाला अशी प्रतिक्रिया दिली.










