महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
लबाड चीन जगासाठी धोकादायक असल्याचा दावा करत तैवानने हल्लाबोल केला आहे. तैवान ची ही भूमिका म्हणजे भारताला अप्रत्यक्ष समर्थनच मानले जात आहे.
देशाच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आपल्या भाषणात देशाचे राष्ट्रपती त्साई इंग वेन यांनी चीन वर जोरदार हल्ला केला. जगभरातील लोकशाहीसाठी चीन हा एक धोका आणि आव्हान बनला आहे. भारत आणि चीन सीमेवरचा संघर्ष हे त्याचेच उदाहरण आहे असही तेव्हाचे राष्ट्रपती वेन यांनी म्हटलं आहे.
जर चीन समानता आणि सन्मान राखत असेल तर आम्ही अर्थपूर्ण चर्चेसाठी तयार आहोत, असेही राष्ट्रपती त्साई इंग वेन यांनी स्पष्ट केले आहे. तैवान राष्ट्रीय दिनानिमित्त त्या बोलत होत्या.
राष्ट्रपती वेन आपल्या भाषणात म्हणाल्या, दक्षिण चीन समुद्रातील विवाद, चीन – भारतीय सीमेवर संघर्ष हॉंगकॉंग मधील चीनचे दडपणाचे धोरण स्पष्टपणे दर्शविते कि इंडो पॅसिफिक प्रदेशांत लोकशाही , शांतता आणि समृद्धी गंभीर आव्हानांना सामोरे जात आहे. आज आपली संरक्षण क्षमता आपण वाढवत आहोत आणि लष्कर हे आमचे भविष्य आहे, ते मजबूत करण्यासाठी कार्य करत राहू.










