मुंबई : महान्यूज लाईव्ह
आता लॉकडाउनचा विषय राहिला नसून महाराष्ट्र नोव्हेंबर पर्यंत अनलॉक होणार आहे असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले, तसेच आरटीपीसीआर तपासणी दर आठशे रुपये पर्यंत आणल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशिरा अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनलॉक बद्दल महत्वाची माहिती दिली.
राज्यात टप्याटप्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायाम शाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करू या असे टोपे म्हणाले.
त्याचबरोबर कोरोना व्हायरसवर अजून लस आलेली नाही त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले.











