• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रँड एन्ट्रीचा नाद, ‘कोल्ड फायर’ फटाक्यांचा घात; बीडच्या लग्नात भीषण दुर्घटना!

tdadmin by tdadmin
May 25, 2026
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
ग्रँड एन्ट्रीचा नाद, ‘कोल्ड फायर’ फटाक्यांचा घात; बीडच्या लग्नात भीषण दुर्घटना!

बीड : महान्यूज लाईव्ह

शाही लग्नसोहळ्यांमध्ये वाढत चाललेल्या दिखाऊ आतिषबाजीचा आणखी एक धक्कादायक परिणाम बीडमध्ये समोर आला आहे. बार्शी रोड परिसरातील एका मंगल कार्यालयात सुरू असलेल्या विवाह समारंभात कोल्ड फायर फटाक्यांचा अचानक भीषण स्फोट होऊन पाच फोटोग्राफर जखमी झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका फोटोग्राफरची प्रकृती गंभीर असून लाखो रुपयांचे कॅमेरे व शूटिंग साहित्य जळून खाक झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बीड शहरातील बार्शी रोडवरील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा सुरू होता. वर-वधूच्या ग्रँड एन्ट्रीसाठी स्टेज परिसरात कोल्ड फायर इफेक्ट आणि फटाक्यांची विशेष आतिषबाजी करण्यात आली होती. त्यावेळी अचानक फटाक्यांच्या मशीनमध्ये स्फोट झाला आणि आगीचे लोळ व धुराचे ढग संपूर्ण स्टेज परिसरात पसरले. काही क्षणांतच लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.

या स्फोटावेळी स्टेजसमोर उभे राहून शूटिंग करणारे फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर थेट आगीच्या तडाख्यात सापडले. यात पाच जण जखमी झाले असून फोटोग्राफर अभिषेक कदम हे गंभीर भाजले गेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यासह डोळे आणि शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अभिषेक कदम यांचा स्वतःचा विवाह काही दिवसांवर आल्याने या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे.

दुर्घटनेत अनेक महागडे कॅमेरे, लाईट्स, ड्रोन आणि शूटिंग उपकरणे आगीत जळून नष्ट झाली. प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या दुर्घटनेने लग्नसमारंभांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. फोटोग्राफर असोसिएशनने या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आयोजक, इव्हेंट मॅनेजमेंट टीम आणि फटाके हाताळणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोल्ड फायर हे नाव जरी सुरक्षिततेचा आभास निर्माण करत असले तरी चुकीची हाताळणी, निकृष्ट दर्जाचे साहित्य किंवा सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवघेणे ठरू शकते असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून शोबाजीसाठी जीव धोक्यात घालणारे लग्नसोहळे अशी टीका नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने अशा कार्यक्रमांमध्ये फटाके व कोल्ड फायर वापराबाबत कठोर नियम लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Next Post
सलग तीन दिवसात दौंड तालुक्यात खुनाच्या आणि खुनी हल्लाच्या घटना ! मुली समोरच वडिलांचे हातपाय तोडले! मुलीचा आक्रोश! तिर्थक्षेत्र भुलेश्वरच्या पायथ्याशी जळालेल्या अवस्थेत मृतदेह!

बार्शीत प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट; लग्नाला महिना पूर्ण होण्याआधीच भर रस्त्यात पत्नीचा निर्घृण खून!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group