• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्याचं सिंचन भवन कोल्हापूर- सोलापूरला स्थलांतरित; आता पुणेकरांना माराव्या लागणार कोल्हापूर- सोलापूरच्या फेऱ्या!

tdadmin by tdadmin
May 24, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
पुण्याचं सिंचन भवन कोल्हापूर- सोलापूरला स्थलांतरित; आता पुणेकरांना माराव्या लागणार कोल्हापूर- सोलापूरच्या फेऱ्या!

पुणे : महान्यूज लाईव्ह

राज्याच्या जलसंपदा विभागातील महत्त्वाची कार्यालये पुण्यातून कोल्हापूर आणि सोलापूर येथे हलविण्याच्या निर्णयामुळे आता सर्वसामान्य शेतकरी, पाटबंधारे लाभधारक आणि ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. प्रशासनिक पुनर्रचनेच्या नावाखाली पुण्याचे महत्त्व कमी करत नागरिकांना शेकडो किलोमीटर दूर हेलपाटे मारण्याची वेळ सरकार आणत असल्याचा आरोप विरोधक आणि स्थानिक स्तरावरून केला जात आहे.

महामंडळाच्या आदेशानुसार मुख्य अभियंता (जलसंपदा) कार्यालय कोल्हापूरला, तर मुख्य अभियंता (जलसंपदा) कार्यालय सोलापूरला हलविण्यात येणार आहे. याचा थेट फटका पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, कालवा लाभधारक, सिंचन प्रकल्पग्रस्त आणि विविध मंजुरींसाठी कार्यालयीन कामे करणाऱ्या नागरिकांना बसणार आहे. आतापर्यंत ही दोन्ही कार्यालय पुण्यातच एकत्र होती. सिंचन भवन या एका इमारतीत ही सर्व कार्यालय होती.

आजपर्यंत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर, मुळशीसह ग्रामीण भागातील नागरिकांना कामासाठी पुण्यात येणे तुलनेने सोयीचे होते. मात्र आता त्याच नागरिकांना साध्या प्रशासकीय कामांसाठी कोल्हापूर किंवा सोलापूर गाठावे लागणार असल्याने वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढणार आहे.

विशेषतः शेतकरी वर्गासाठी हा निर्णय अधिक त्रासदायक ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. आधीच दुष्काळ, पाणीटंचाई, सिंचनाच्या समस्या आणि कार्यालयीन प्रक्रियेमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता शेकडो किलोमीटरचा प्रवास करून अधिकाऱ्यांच्या दारात जावे लागणार आहे. कार्यालयीन पुनर्रचना या नावाखाली ग्रामीण जनतेला अक्षरशः वाऱ्यावर सोडले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

अनेक नागरिकांनी पुण्यातील कार्यालये हलविण्यापूर्वी नागरिकांची सोय, अंतर, प्रवास खर्च आणि ग्रामीण भागातील अडचणींचा सरकारने विचार केला का असा सवाल उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुण्याचे केवळ प्रशासकीय महत्त्वच कमी होत नसून ग्रामीण भागातील नागरिकांची पिळवणूक वाढणार असल्याची टीका होत आहे.

दरम्यान या संदर्भात बारामती तालुक्यातील सुपे येथील शेतकरी संघर्ष कृती समितीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. हे कार्यालय स्थलांतरित होऊ नये अशी मागणी देखील या संघर्ष समितीने केली आहे. भाजपचे नेते पोपटराव खैरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र लव्हे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी यावेळी सुनेत्रा पवार यांना भेटून याची माहिती दिली. दरम्यान हे कार्यालय पुण्यातच राहील अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याकडेही शेतकऱ्यांनी या संदर्भात मागणी केली असून जलसंपदा विभागातील माजी अधिकाऱ्यांनी देखील या संदर्भातील भविष्यातील धोका स्पष्ट केला आहे. या संदर्भात आपण आक्रमकपणे पाठपुरावा करू असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group