• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीत आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेट उद्ध्वस्त ; ६३४ किलो गांजा; सात आरोपी जेरबंद! तीन कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त!

tdadmin by tdadmin
May 22, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामतीत आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेट उद्ध्वस्त ; ६३४ किलो गांजा; सात आरोपी जेरबंद! तीन कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त!

बारामती : महान्यूज लाईव्ह

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या धडक कारवाईत आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल ६३४ किलो गांजा, दोन इनोव्हा कार आणि इतर मुद्देमाल असा एकूण ३ कोटी ३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७८/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(c), 20(b)(ii)(c), 29 अन्वये २८ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळोची-पिंपळी रोड परिसरातील एका शेतामध्ये दोन प्लास्टिक ड्रममध्ये ४७८ किलो ९५० ग्रॅम गांजा साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गांजाची किंमत तब्बल २ कोटी ३९ लाख ४७ हजार ५०० रुपये इतकी होती.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांची दोन विशेष पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली होती. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची नावे समोर आली. यामध्ये १) प्रकाश ऊर्फ पक्क्या मोहन काटे (वय २९, रा. कल्याणीनगर, तांदुळवाडी, ता. बारामती), २) समाधान धर्मराज गायकवाड (वय २३, सध्या रा. सांगवी, ता. बारामती, मूळ रा. अरणगाव, ता. परांडा, जि. धाराशिव), ३) प्रिन्सकुमार मुन्ना सिंग (वय २२, रा. महाराजगंज, बिहार), ४) राहुल कल्याण गोरे (वय २७, रा. उंब्रज पारगाव, जि. बीड) यांना ३ मे २०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्यांनी आणखी साथीदारांची नावे उघड केली. यानंतर पोलिसांनी ५) विकी ऊर्फ पप्पू विजय कांबळे (वय ३२, रा. भिमनगर, जळोची, ता. बारामती), ६) संग्राम ऊर्फ चंदन सिंग (रा. मारुंजी रोड, पुणे), ७) जॉकी माझी (रा. ओडिशा) यांचा शोध सुरू केला. हे आरोपी छत्तीसगड येथून गांजा आणून पश्चिम महाराष्ट्रात विक्रीसाठी साठवत असल्याची माहिती तपासात पुढे आली.

२० मे रोजी पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगली पोलिसांच्या मदतीने एमएच ०२ सीजी ०३०२ या इनोव्हा कारवर कारवाई करत विकी ऊर्फ पप्पू कांबळे याला ताब्यात घेतले. या वाहनातून १३४ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ३३ लाख ५५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर २१ मे रोजी बारामतीतील गवारे चौक परिसरात एमएच ०२ ईई ४९४९ या इनोव्हा कारवर छापा टाकण्यात आला.

यावेळी वाहनातून २३ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी १) हुसेन सुखदेव लष्करे (वय ३५, रा. सुतारदरा, कोथरूड, पुणे), २) आदित्य विकास शिंदे (वय २०, रा. कोथरूड, पुणे), ३) युवराज ज्ञानेश्वर दुर्गे (रा. सुतारदरा, पुणे, मूळ रा. मुळशी) यांना ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक तपासात आरोपी छत्तीसगडमधून गांजा आणून पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी समन्वयाने काम करत मोठे आंतरराज्य रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईमध्ये दोन चार चाकी वाहने, ६३४kg वजनाचा गांजा आणि इतर मुद्देमाल असा मिळून ३ कोटी ३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पदार्थाचे तस्करी मधील एक मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलीस स्टेशनला यश मिळाले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, फौजदार बाळासाहेब कारंडे, अंमलदार अभिजीत एकशिंगे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, स्वप्निल अहिवळे, अमोल शिंदे, निलेश शिंदे, अजय घुले फौजदार रत्नदीप भंडारे, रामचंद्र शिंदे सुलतान डांगे, अमोल शिंदे, उत्तम खाडे, यशवंत पवार, गिरीश नेवसे, अमोल देवकाते अक्षय सिताफ, विशाल शिंदे, सागर जामदार, बनसोडे, झणझणे यांनी केली आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group