• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माळेगावच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळ इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा प्रवेशासाठी एफ.सी. केंद्र सुरू

tdadmin by tdadmin
May 22, 2026
in सामाजिक, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
माळेगावच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळ इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा प्रवेशासाठी एफ.सी. केंद्र सुरू

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
माळेगांव : शिवनगर विद्या प्रसारक मंडळ माळेगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी डिप्लोमा अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी एफ.सी. (Facilitation Centre) केंद्र सुरू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रथम वर्ष डिप्लोमा तसेच थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि वेळेत पूर्ण व्हावी या उद्देशाने हे केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे, अर्जातील माहिती तपासणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, गुणवत्ता यादी व केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भातील मार्गदर्शन अशा विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींवर मात करणे अधिक सोपे होणार आहे.

संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. आर. शहा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी संस्थेने विशेष नियोजन केले आहे. प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अनुभवी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश समन्वयक प्रा. ए. एस. मोरे आणि प्रा. एस. जे. लाड यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना सांगितले की, ऑनलाइन अर्ज भरताना अनेकदा छोट्या चुका होतात आणि त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह एफ.सी. केंद्राला भेट देऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.

तर थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश समन्वयक डॉ. व्ही. व्ही. तावरे आणि डॉ. व्ही. पी. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी आपली पात्रता, गुणपत्रिका आणि इतर आवश्यक कागदपत्रे वेळेत तपासून घ्यावीत, असे सांगितले. अर्ज पडताळणी वेळेत पूर्ण केल्यास प्रवेश प्रक्रियेत होणारा संभाव्य विलंब टाळता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

एफ.सी. केंद्रात विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यास मदत, अर्ज व कागदपत्रांची तपासणी, गुणवत्ता यादी आणि सीएपी प्रक्रियेबाबत माहिती, प्रवेश निश्चिती प्रक्रिया तसेच संपूर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण टाळण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांसह वेळेत एफ.सी. केंद्राला भेट देऊन आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.

Next Post
बारामतीत आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेट उद्ध्वस्त ; ६३४ किलो गांजा; सात आरोपी जेरबंद! तीन कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त!

बारामतीत आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेट उद्ध्वस्त ; ६३४ किलो गांजा; सात आरोपी जेरबंद! तीन कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group