महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 5 अंतर्गत मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. अनलॉक 5 मध्ये 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपट गृह उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र थिएटरमध्ये 50% प्रेक्षकांना परवानगी असणार आहे.
मार्च महिन्यापासून शाळा आणि चित्रपटगृह बंद आहे. आता त्यांना उघडण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान आज चित्रपटगृह सुरू करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू केल्यापासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरू होणार आहेत.
केंद्र सरकारतर्फे चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ पन्नास टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती देण्यात येणार आहे.
सिनेमा, थिटर्स, मल्टिप्लेक्स टॉकीज, 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.











