महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
म्यानमारमध्ये भारत पेट्रोलियम रिफायनरीत सहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
चीन म्यानमार सोबत ऊर्जा सहकार्य संबंध बळकट करत असताना भारत राजनितिक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या क्षेत्रात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच दृष्टीने भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला आणि लष्कर प्रमुख एमएम नरवणे यांचा म्यानमार दौरा महत्त्वाचा आहे.
या दौर्यात म्यानमार आणि भारतामध्ये पेट्रोलियम रिफायनरीत सहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी चर्चा होईल.
यंगुण जवळ थानलीन भागात भारताने पेट्रोलियम रिफायनरी उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे, असे सूत्रांनी सांगितले. आत्तापर्यंत इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेडने या प्रकल्पात रस दाखवला असून दोन्ही देशांचा हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
म्यानमारच्या ऊर्जा क्षेत्रात एकट्या चीनची 70% परकीय गुंतवणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर हर्ष शृंगला आणि लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी म्यानमारच्या राष्ट्रीय नेत्या ऑंग सॅन स्यू की आणि डिफेन्स सर्विस चे कमांडर इन चीफ जनरल मिन ऑंग यांची भेट घेतली.
दोन्ही पक्षांमध्ये सीमा भागात सुरक्षा आणि स्थिरता कायम ठेवल्याबद्दल चर्चा झाली. आपल्या भूमीचा परस्परांविरुद्ध वापर करू द्यायचा नाही असे सुद्धा या बैठकीत ठरले.
बंडखोरी करून म्यानमारमध्ये आश्रय घेणाऱ्या 22 बंडखोरांना पुन्हा भारताकडे सोपवण्याच्या म्यानमारच्या निर्णयाचे भारताने कौतुक केले.











