• Contact us
  • About us
Monday, August 31, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाज्योती प्रशिक्षण ऑफलाइन करा! भाजपच्या युवा मोर्चाची मागणी!

tdadmin by tdadmin
March 23, 2026
in सामाजिक, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
महाज्योती प्रशिक्षण ऑफलाइन करा! भाजपच्या युवा मोर्चाची मागणी!

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह

राज्यातील बहुजन समाजातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी ‘महाज्योती’मार्फत दिले जाणारे प्रशिक्षण पुन्हा ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (महाज्योती) या संस्थेमार्फत बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), रेल्वे आदी स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र, अलीकडे हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले असून, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये राहून अभ्यास करणे आवश्यक असते. या ठिकाणी मिळणारे स्पर्धात्मक वातावरण, अनुभवी मार्गदर्शकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि नियमित अभ्यासाची शिस्त यामुळे ऑफलाइन प्रशिक्षण अधिक प्रभावी ठरते. ऑनलाइन पद्धतीत या गोष्टींचा अभाव जाणवत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान,२८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी ‘महाज्योती’मार्फत घेण्यात आलेल्या सीईटी चाळणी परीक्षेत सुमारे ९० टक्के विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची बाब समोर आली आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन प्रशिक्षणावरील नाराजीचे स्पष्ट संकेत असल्याचे सोलनकर यांनी नमूद केले.

या मागणीसाठी देण्यात आलेल्या निवेदनावेळी स्वप्नील मोडक, अमर बुदगुडे, ओंकार कड्डे, रसिका सणस, आबासाहेब थोरात, अनिकेत भालेराव, सुयोग सावंत, परमेश्वर तागुंदे, जगदीश कोळेकर, विवेक साळुंखे, संदीप केसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या मागणीवर सरकार काय निर्णय घेणार, तसेच ‘महाज्योती’चे प्रशिक्षण पुन्हा ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Next Post
बारामतीच्या ग्रामीण भागात दररोज ४ तास भारनियमन; नागरिक त्रस्त, संताप वाढला!

बारामतीच्या ग्रामीण भागात दररोज ४ तास भारनियमन; नागरिक त्रस्त, संताप वाढला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group