राजकुमार लव्हे, बाबुर्डी, बारामती
लक्ष्मण हाकेंना अजित पवार नावाची काविळ झालेली आहे. ते स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वत:चे महत्व वाढवण्यासाठी फक्त आणि फक्त अजित पवार यांच्यावर सतत भुंकत असतात. कालही लक्ष्मण हाकेंनी बारामतीत येऊन अजितदादांवर एकेरी शब्दात टीका केली. महत्वाचे म्हणजे ज्यावेळी हाके अजितदादांवर टीका करत होते, त्यावेळी हाकेच्या आजुबाजूला जे सोबत उभे होते, त्यामध्ये काही जण तर अजित पवार यांच्यामुळे स्वत:ची ओळख तयार झालेले काही आजी माजी पदाधिकारी होते.
हाके दादांवर टीका करत असताना हेच पदाधिकारी त्यावेळी शांत ऐकून घेत होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना काही पदाधिकाऱ्यांनी अजितदादांचा यामध्ये संबंध नसल्याचे सांगितले, पण ज्यावेळी हाके अजितदादावर टीका करतात, त्या टिकेला कुठलेच खरेपण नसते, त्याचवेळी त्यांना सुनवायला पाहिजे होते. पण दादांकडूनच पदे घ्यायची, दादांकडून स्वत:ची कामे करून घ्यायची, दादांचे नाव वापरून प्रसिद्धी मिळवायची आणि ज्या नेत्यामुळे आपली ओळख तयार झाली, त्याच नेत्यावर आपल्याशेजारी बाहेरचा कोणतरी येऊन एकेरी शब्दात बोलत असताना हे मूग गिळून गप्प बसायचे हे बरोबर नाही.
तुम्ही स्वत:च्या समाजासाठी, आरक्षणासाठी, त्यांच्या न्यायहक्कासाठी जरूर लढा, पण जर कोणीही माथेफिरू येऊन गेल्या 40 वर्षात जात-पात न पाहता आदर्शवत असे काम करणाऱ्या नेत्यावर टीका करत असेल, जो नेता कधीच जातपात बघत कधीच भेदभाव करत नाही, जो नेता हातात कागद आल्यावर कधीच कोणती जात आहे, कोणत्या पक्षाचा आहे, बघत नाही. जो नेता पहाटे पाच पासून कामाला सुरूवात करतो. अशा नेत्यावर टीका करत असतात. तुम्ही गप्प बसता आणि काही अडचण, मदत लागली की, तुम्हाला अजितदादा आठवतात. असं अनेक आजी माजी पदाधिकारी तालुक्यात मोठ्या राजेशाही थाटात वावरतात
अजितदादा बारामतीत आलं की त्याचं पुढेपुढे करतात. दादांना एवढा काय गराडा घालतात की, बोलायचचं काम नाही! अन् ज्यावेळी बारामतीमध्ये अजितदादा यांच्यावर कोणीही माथेफिरू एकेरी शब्दात टीका करून जातो, त्यावेळी ही सगळी कुठल्या बिळात जाऊन बसतात? हे मात्र तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला कळत नाही. खरंतर दादांनी अशा लोकांना खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे.
ठणकावून सांगतो, मी राजकुमार लव्हे मी पण एक ओबीसी आहे. कोण हाके आणी कसला तो ओबीसी नेता? आमचा एकच नेता विकासपुरुष अजितदादा! बारामतीमधील ओबीसी समाज हा कधीच असल्या माथेफिरू लोकांच्या पाठीमागे जाणार नाही. बारामतीमधील ओबीसी समाजाला चांगले माहीत आहे की, आपल्या सुखात दुःखात असेल, आपलं काहीजरी काम असेल, तर आपल्यासाठी फक्त अजितदादा आहेत बाकी कोणीही नाही. बाहेरचे कोणीही येईल. एक तासभर गरळ ओकून जाईल, पण आपल्यासाठी फक्त अजितदादाच! बाकी कोणीही नाही.
एक विसरू नका. त्यांचं फक्त राजकारण आहे. त्यांना फक्त ज्याप्रमाणे पवारांवर टीका करून इतर काही गावकरी हे जसे नेते बनले, तसे एका रात्रीत नेते बनण्याचा एकच मार्ग म्हणजे बारामती. येथे येऊन पवार कुटुंबाला शिव्या घातल्या की, साहजिकच वरून रसद मिळते. कौतुक होते आणि एखादी आमदारकी सुद्धा मिळून जाते..! पण अशा अल्पकालीन समाधानासाठी जे वर्षानुवर्षे रचनात्मक काम करून माणूस उभा करतात, ते मात्र विनाकारण बदनाम होतात..! म्हणूनच अशा बदनामीवेळी माझ्यासारख्या डोळे उघडे ठेवून परिस्थितीकडे पाहणाऱ्या प्रत्येक ओबीसी बांधवाने नाण्याच्या दोन्ही बाजू उघड्या केल्याच पाहिजेत..!











