स्वप्निल कुचेकर, बारामती
गावाकडच्या मातीतल्या आपल्या वाटणाऱ्या साध्यासुध्या परंतु आभाळाला हात पोहोचलेल्या कलाकारांचा द फोक कलाकार हा मनोरंजनाचा शो पहिल्यांदा बारामतीत होतोय. सोशल मीडियावर सध्या गाजणारे हे कलाकार बारामतीत येत आहेत.. हे कलाकार असे आहेत की, त्यांच्या पाठीवर थाप टाकावी अशी अपेक्षा आहे..
बारामतीतील गदिमा सभागृहात 24 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. अर्थातच या कार्यक्रमासाठी 100 रुपये व दोनशे रुपये अशा प्रवेशिका आहेत. कोणताही कृत्रिम बाज न ठेवता नैसर्गिक वाद्यातून व स्वतःच्या अदाकारीतून एक उत्तम प्रकारचा रंगमंच हे सर्व कलाकार सजवणार आहेत.
कोण कोण आहे त्या कार्यक्रमात?
तुम्हाला माहित असतील जे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांना आप्पांच्या करामती फेम प्रशांत तकिक हे सगळ्यांनाच माहीत असतील. जनी म्हणजेच स्नेहल विधाते यांची गाणी आणि ढोलकी साहिल मुलाणीची..! सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातील प्रसिद्ध कलाकार सोहेल मुलांनी भारूडकार गणेश पाटोळे, मिमिक्री व नक्कलकार पांडुरंग वाघमारे, लेखक व दिग्दर्शक म्हणून ठसा उमटवलेले स्वप्निल कुचेकर, सारेगमप चा विजेता सार्थक गायकवाड, सोनी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध झालेल्या गौळणीचे कलाकार अविनाश महाराज हे सगळे सगळे बारामतीत येत आहेत.
अर्थातच कोणताही डीजे कोणताही कृत्रिम वाद्याचा बाज न ठेवता पखवाज मृदंग, टाळ, बासुरी, ढोलकी, तबला, पेटी, सनई, डफ ही वाद्य वाजवून गावाकडच्या या मातीतल्या पोरांच्या कला बारामतीत वाजणार आहेत.. अन् गाजणार आहेत. ही पोरं म्हणतात, आम्हाला नाय स्टेज मिळालं तरी चालेल, पण आमची मातीतली कला आम्ही जीवंत ठेवणार! आमची कला आमच्यासारख्या कलाकाराला जीवंत ठेवते.. अन् आमच्या कलाकारांचं पोट पैशांनी नाही, तर कलेने भरतं.. म्हणून तुमच्यासारख्या कलेला दाद देणाऱ्या गावाकडच्या माणसांची गरज आहे..!
बस फक्त पाठीवर हात ठिवा..तुमच्या आशिर्वादाची आणि प्रेमाची गरज आहे, या गावाकडच्या पोरांना! मग बारामतीकर येताय नव्हं? नक्की या 24 ऑगस्ट रोजी बारामतीतील विद्यानगरी परिसरातील गदिमा या सभागृहात संध्याकाळी सात वाजता!











