बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत श्री निलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांची यादी रविवारी जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या-जुन्या चेहऱ्यांचा मेळ घालत ही यादी निश्चित केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीपुरस्कृत श्री निलकंठश्वर पॅनलकडून उमेदवारी मिळवण्यासाठी तब्बल २५० जण इच्छुक होते.. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. रविवारी पुन्हा बारामती दौऱ्यावर आल्यानंतर अजित पवार यांनी उमेदवार यादी निश्चित केली.. माळेगाव कारखान्याची निवडणूक येत्या २३ फेब्रुवारी रोजी होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री निलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांची यादी रविवारी जाहीर करण्यात आली.
श्री निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार :
माळेगाव गट : १) बाळासाहेब पाटील तावरे२) पोपटराव शंकरराव बुरुंगले ३) संजय वसंतराव काटे पणदरे गट : १) तानाजी तात्यासाहेब कोकरे २) केशवराव सर्जेराव जगताप ३) योगेश धनसिंग जगताप सांगवी गट : १) सुरेश तुकाराम खलाटे २) अनिल कृष्णराव तावरे ३) नितीन पोपटराव जगताप निरावागज गट : १) मदनराव तानाजी देवकाते २) बन्सीलाल विलास आटोळे ३) गुलाबराव आप्पाजी देवकाते बारामती गट : १) वसंतराव बापूराव गावडे २) नितीन सदाशिव सातव ३) राजेंद्र शंकरराव ढवाण महिला राखीव : १) संगीता बाळासाहेब कोकरे२) अलका तानाजी पोंदकुले भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग : १) तानाजी नामदेव देवकाते इतर मागास प्रवर्ग : १) सागर अशोक जाधव अनुसुचित जाती प्रवर्ग : १) दत्तात्रय लक्ष्मण भोसले ब वर्ग संस्था प्रतिनिधी : १) स्वप्निल शिवाजीराव जगताप











