Mahakumbhh at prayagraj
असं सांगितलं जातंय की प्रयागराज मध्ये भरलेल्या महा कुंभामध्ये 60 कोटी लोकांपेक्षा अधिक लोकांनी महास्नान केले. आता ही बेरीज करायला कोण गेले का? चला धार्मिक प्रश्न आहे 60 कोटी तर 60 कोटी! या संदर्भामध्ये स्नान केल्याने अनेकांना आपले पाप घेऊन निघाल्याचे साक्षात्कार झाला या निमित्ताने उत्तर प्रदेश ला पर्यटनाचा लाभ झाला आणि अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहचे सर्वात मोठे साधन मिळाले
यामध्ये एका कुटुंबाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दीड महिना सुरू असलेल्या या महाकुंभामध्ये या कुटुंबाने चांगलाच हात धुवून घेतला. विशेष म्हणजे याची माहिती विधानसभेच्या अर्थसंकल्पाच्या चर्चा दरम्यान खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. एका कुटुंबाकडे तब्बल 130 बोटी आहेत. या एकाच कुटुंबाने या दीड महिन्यामध्ये तब्बल तीस कोटी रुपये कमावल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.
एका बोटीपासून या कुटुंबाने 45 दिवसांमध्ये तब्बल 23 लाख रुपये कमावले. म्हणजेच एका दिवसाला 50 ते 52 हजार रुपये एका बोटीमागे त्यांना मिळाले. योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या या माहितीची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारने कुंभमेळ्यासाठी पाच नवीन श्रद्धा कॉरिडॉर उभारले होते. या पाच तात्पुरत्या बंदरामुळे उत्तरप्रदेश मधील काशी, अयोध्या, गोरखपूर, चित्रकूट, मथुरा, वृंदावन यासारखी धार्मिक स्थळे थेट जोडली गेली आणि बोटीचा व्यवसाय देखील आणि परिसरातील बाजारपेठा देखील तेजीत आल्या.











