राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
आज पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या विशेष कारवाईत दोघा जणांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार दोघांना ताब्यात घेतल्यानंतर यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेला मोबाईल त्यांच्याकडे आढळून आला आणि यवतसह भिगवणच्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले गुन्हे उघडकीस आले.
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेला एक मोबाईल याच हद्दीत कोणीतरी वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने व यवत पोलिसांनी स्थानिक कारवाई केली संयुक्त कारवाई केली.
गोपनीय माहितगाराकडून पोलिसांना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेला मोबाईल निलेश गोरे याचेकडे असून तो त्याचे साथीदारासह वरवंड येथील पूला जवळ येणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना याची माहिती कळवण्यात आली आणि यवत पोलिसांनीही वरवंडच्या पुलाजवळ सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार दोघेजण दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यापैकी मोटरसायकल चालवणारा निलेश गोरे असल्याची खात्री झाल्याने दोघांना ताब्यात घेऊन नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे निलेश गणेश गोरे (वय 22 वर्षे, रा. खंडोबानगर बारामती) व आकाश दत्ता सोनवणे (वय 22 वर्षे राहणार बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे) असे सांगितले त्यानंतर दोघांची झडती घेतली असता निलेश गोरे याच्याकडे MI कंपनीचा मोबाईल मिळून आला.
त्याचा IMEI तपासला असता तो यवत पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीस गेलेला मोबाईलशी मिळता जुळता असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेऊन, अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली, तसेच त्यांनी भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतही आणखी एक गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. या गुन्ह्याचा अधिक तपास फौजदार नागरगोजे करीत आहेत. दरम्यान ही कारवाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आनंद भोईटे, पोलीस उपअधीक्षक स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक राहुल गावडे, कुलदीप संकपाळ, सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, पोलिस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, अजय घुले, राजू मोमीन, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, अतुल डेरे, निलेश शिंदे, मुकुंद कदम यांनी केली.











