विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या भाषणामध्ये बारामतीकरांनी १ लाख ६५००० मतांचं ओझं माझ्या डोक्यावर टाकल आहे. त्यामुळे मला जास्त काम कराव लागतय. असं नेहमीच आपल्या भाषणामध्ये सांगत असतात. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर व सत्तेत सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार भरला.
या जनता दरबारात नागरिकांची कामे जागच्या जागी मार्गी लावण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न असतो. या जनता दरबाराला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. नागरिकांच्या समस्या,अडचणी समजून घेऊन कामे उपमुख्यमंत्री अजित पवार जागच्या जागी मार्गी लावत असतात व त्या ठिकाणी तात्काळ मार्ग काढला जातो.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार तब्बल दोन महिन्यानंतर बारामतीत आले होते. त्यावेळीही बारामतीकारांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले होते. मात्र तेव्हापासून त्यांचा जनता दरबार झाला नव्हता. मात्र सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच जनता दरबार भरला.
या जनता दरबारावेळी विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. नागरिकांचे ज्या विभागाशी कामे आहेत. त्या विभागाला सूचना करत नागरिकांची कामे तात्काळ मार्गी लावतात. त्यामुळेच बारामतीतील नागरिकही जनता दरबाराला गर्दी करतात.











