राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील सिद्धिविनायक पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने येऊन दोघांनी पिस्तूल रोखले व पेट्रोल पंपावरील रक्कम चोरून नेली. याप्रकरणी यवत पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, मात्र यामध्ये हे दोघेही आरोपी सापडले असून, इंदापूर तालुक्यातील ते दोघे असल्याचे माहिती पोलिसांनी दिली. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
अनिकेत दादासाहेब ढोपे (वय 22 वर्ष रा. शेळगाव ता. इंदापूर, जिल्हा पुणे), 2) धनंजय लक्ष्मीनारायण हगारे (वय 20 वर्षे, रा. अंथूर्णे तालुका इंदापूर जिल्हा पुणे) या दोघांची नावे असून त्या नाटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली या दोघांविरुद्ध आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीधर अशोक भागवत यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. ही घटना 30 सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी एक ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला होता. दिलेल्या माहितीनुसार
30 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सिद्धिविनायक पेट्रोल पंपावर भागवत हे नेहमीप्रमाणे काम करत असताना दोघेजण टीव्हीएस आपाची या मोटरसायकल वरून आले.
या दुचाकी ला क्रमांक नव्हता. त्यापैकी एका जणाने पिस्तूल काढून भागवत यांना कानाजवळ लावला व पिस्तुलाचा धाक दाखवून तुझ्याकडे सर्व पैसे काढ, नाहीतर गोळी घालील अशी धमकी दिली आणि चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दुसऱ्याने धारदार लोखंडी कोयत्याच्या चपट्या बाजूने मारहाण केली.











