महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
सरकार कोरोनाला जर देवाची करणी म्हणत असेल तर चीनने आपला भूभाग बळकावला, ती सुध्दा देवाचीच करणी आहे काय? असा सवाल कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केला आहे.
आज गांधी यांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले. राहूल गांधी यांनीच चीनने भारतीय भूभाग बळकावल्याचे सर्वप्रथम स्पष्ट केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने सुरवातीस सारवासारव व नंतर कबुली दिली होती.
आता पॅंगॉंग सरोवराच्या काठावर चीनचे सैन्य जमा होत असून दररोज तेथे हालचाली सुरू आहेत. तेथे समोरासमोर भारतीय सैन्यही उभे ठाकलेले आहे. प्रचंड तणावाची परिस्थिती असून भारतीय माध्यमातून यासंदर्भात फारसं महत्व दिलं जात नाही.
या पार्श्वभूमीवर आज राहूल गांधी यांनी निशाणा साधत केंद्र सरकारला खोचक सवाल केला. चीनने आपली पुन्हा जमीन घेतली आहे, सरकारकडे ही जमीन ताब्यात घेण्याचे काही धोरण असेल, ते आहे का? की, सरकार याला देखील देवाची करणी समजत आहे असा सवाल त्यांनी केला आहे.










