महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
तैवान आणि चीनच्या संबंधात आलेली कटूता आता आणखीच तीव्र झाली आहे. तैवानचे उपराष्ट्रपती लाइ चिंग टे यांनी चीनला सरळ इशारा दिला असून हस्तक्षेप कराल, तर वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.
तैवानच्या उपराष्ट्रपतींनी म्हटले की, आपल्या मर्यादा ओलांडण्याची चूक करू नका. आम्हाला शांतता हवी आहे. आम्ही आमच्या नागरीकांचे संरक्षण करू शकतो. हस्तक्षेप कराल तर वाईट परिणाम भोगावे लागतील.
चीनची लढाऊ विमाने मागील काही आठवड्यांत तीन वेळा तैवानची सीमा ओलांडून आली आहेत. यामुळे भारत,जपान पाठोपाठ तैवानने देखील चीनला थेट इशारा केला आहे. अवघ्या सव्वा दोन कोटींची लोकसंख्या असणारा तैवान हा आमचाच प्रदेश असल्याचा दावा चीन नेहमी करत आला आहे. चीनच्या या कुरघोड्यामुळे तैवान मध्ये अशांतता निर्माण झाल्याचे तैवानच्या उपराष्ट्रपतींचे म्हणणे आहे. संपूर्ण जगाने एकत्र येऊन चीनला यासंदर्भात उत्तर द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.










