‘करे योग रहे निरोग’ च्या घोषणा देऊन शरीर संपत्ती जपण्याचा दिला संदेश..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : 21 जून या जागतीक योगदिवसाच्या जनजागृतीसाठी इंदापूर येथील पतंजली योग समितीच्या वतीने काल सोमवारी (दि.19) सायंकाळी सात वाजता इंदापूर शहरातून मशाल रॅली काढण्यात आली. यावेळी करे योग रहे निरोग च्या घोषणा देत योगसाधकांनी 21 जुन च्या योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
माजी उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गोरख शिंदे, प्रा.कृष्णा ताटे , रमेश शिंदे, गफूर सय्यद,भारत स्वाभिमानचे अध्यक्ष जयकुमार शिंदे, बिभिषण खबाले, मल्हारी घाडगे यांचे हस्ते ज्योत प्रज्वलीत करण्यात आली..
यावेळी युवा भारतचे प्रशांत गिड्डे , सचिन पवार, रविंद्र परबत, आण्णा चोपडे, रामेश्वर साठे, ज्ञानु डोंगरे, शरद झोळ, भालचंद्र भोसले, किसन पवार, हमीद आतार, गणेश शिंदे, सुनिल कांबळे, शंकर काशीद आदींसह योगसाधक आणि महिला रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.