दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील रेशन दुकानदार संघटनेचे माजी अध्यक्ष रामभाऊ विष्णू जायगुडे (रा.ओझर्डे ( जायगुडेवाडी) हल्ली राहणार ब्राम्हणशाही वाई) यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वाई येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
रामभाऊ जायगुडे हे व्यवसायाच्या निमीत्ताने ते वाई शहरात आले .येथे त्यांनी शासकीय स्वस्त धान्य दुकान सुरु करुन आपल्या व्यवसायाला सुरवात केली होती. अडचणीच्या काळात सर्वांना मदत करण्याची भावना त्यांच्यामध्ये असल्याने वाई शहरातील सामाजिक, शैक्षणीक, सहकार, राजकीय संघटनेचे ते सहकारी कार्यकर्ते होते.
वाई शहरासह तालुक्यात वेगळी ओळख निर्माण करण्यास ते यशस्वी झाले. वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचेही ते संचालक होते.