बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत मागील काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. या पार्श्वभूमीवर एन्व्हॉर्यमेन्टल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या पुढाकारातून व स्व. माणिकबाई चंदूलाल सराफ रक्तपेढीच्या सहकार्यातून बारामतीतील मंगेश ओमासे मित्र परिवाराच्या वतीने रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
एन्व्हॉर्यमेन्टल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत साहिल हिल येथील बारामती क्लबमध्ये हे शिबिर होणार आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे आता समाजातील विविध घटकांनी पुढे येवून रक्तदानाची मोहीम उभारण्याची आवश्यकता असल्यामुळे मंगेश ओमासे मित्र परिवाराने या शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेऊन सध्या समाजासमोर उभ्या राहिलेल्या संकटाच्या निवारणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मंगेश ओमासे मित्र परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी 9765659039 आणि 9096839958 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.










