इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात 25 ऑगस्ट रोजी एक कैदी कोरोनाग्रस्त आढळला होता, या कैद्याच्या संपर्कातील 17 कैद्यांना दुसर्या दिवशी म्हणजे 26 ऑगस्ट रोजी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले, त्यांना इतरत्र न हलवता त्याच बराकीत ठेवून एकत्र ठेवल्याबद्दल तुरुंग अधिकार्यावर कारवाई करण्याची कैफियत ग्राहक संरक्षण परिषदेची सदस्य आरोग्य तुषार झेंडे पाटील यांनी मानवी हक्क आयोगाकडे केली आहे.
या घटनेने इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्याच्या प्रशासनातील विविध विभाग एकमेकांशी अजिबात समन्वय ठेवत नाहीत, त्यातून तालुक्यात प्रशासकीय यंत्रणेमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे, अशा स्थितीत तुरुंगातील कैद्यांचा विषय ऐरणीवर आला आहे.
26 ऑगस्ट रोजी इंदापूर तुरुंगातील विविध गुन्ह्यात अटकेत असलेल्या सतरा कैद्यांना एकाच वेळी कोरोना ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याने तालुक्यात अगोदरच खळबळ उडाली होती, मात्र त्यानंतर ग्राहक संरक्षण परिषद सदस्य अॅड. तुषार झेंडे पाटील त्यांनी माहिती घेऊन कैद्यांशी संवाद साधला.
यामध्ये या कैद्यांना कोरोना झाल्यानंतरही एकत्र ठेवले जात असल्याचे व त्यांना स्वतंत्ररीत्या कुठेही उपचार करण्यासाठी दाखल केली नसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावरून त्यांनी तातडीने मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली व यासंदर्भात प्रशासनावर ती तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली. आता मानवी हक्क आयोग या वरती काय निर्णय घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.










