दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील आठ महिला आणि पाच पुरुष अशा १३ जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
सोमवारी कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील ५३ जणांची स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटरमध्ये तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल आज मंगळवारी ( दि. २५ ) प्राप्त झाला. त्यामध्ये ५३ पैकी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित ४३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. द
शासकीय तपासणीत पाटस येथील सहा आणि खासगी रूग्णालयातील प्रयोग शाळेत दोन अशा आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कुरकंभ येथे चार, देऊळगाव राजे येथील दोन, खडकी, गिरीम येथील प्रत्येकी एक अशा एकूण १३ जणांचा समावेश आहे. दरम्यान शहरातील कोवीड सेंटर चा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.










