इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता बारामतीलाही मागे टाकणार अशीच चिन्हे आहेत. आज दिवसभरात तब्बल ४३ जण कोरोनाबाधित आढळून आले. धक्कादायक बाब अशी की, संपूर्ण कुटुंबे कोरोनाबाधित आढळू लागल्याने इंदापूर तालुक्यातील जे कोणी तरूण किंवा बाहेर फिरणारे आहेत, त्यांनी ताबडतोब स्वतः क्वारंटाईन व्हा, उगीचच आपल्या कुटुंबावर क्वारंटाईन होण्याची, अख्खे कुटुंब दवाखान्यात दाखल करण्याची वेळ येऊ देऊ नका असे सांगण्याची वेळ आली आहे.
इंदापूर तालुक्यातील काही गावांमधील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील कुटुंबातील सर्व सदस्य कोरोनाबाधित आढळू लागले आहेत. आता याचा परिणाम दिसू लागला असून दोन दिवसांपूर्वीच जाचकवस्ती येथील संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त आढळून आले होते. आता तालुक्यातील इंदापूर शहरातील रामदास गल्ली, अंथुर्णे, वालचंदनगर, माळवाडी नंबर २ व कुरवली अशा गावातील संपूर्ण कुटुंबे कोरोनाग्रस्त आढळली आहेत.
इंदापूर तालुक्यातील रेडणी येथील ७३ वर्षीय पुरूष, इंदापूर शहरातील ४० वर्षीय पुरूष, रामदास गल्लीतील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश असून यामध्ये ६५ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरूष, ३३ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगी, १२ वर्षीय मुलगा यांचा यामध्ये समावेश आहे. शेळगाव येथील ३४ वर्षीय पुरूष, माळवाडी नंबर २ येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये ४८ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महिला, २६ वर्षीय पुरूष, २३ वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय महिला, ३ वर्षीय मुलाचा समावेश आहे. भाटनिमगाव येथील ४९ वर्षीय महिला, उध्दट येथील ४५ वर्षीय महिला, इंदापूर शहरातील यशवंतनगर येथील २७ वर्षीय पुरूष, दत्तनगर येथील एक २७ वर्षीय पुरूष, अंथुर्णे येथील ५६ वर्षीय महिला, ३६ वर्षीय महिला, २० वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलास कोरोनाची बाधा झाली आहे.
वालचंदनगर येथील कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये २२ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरूष, १७ वर्षीय मुलगी, ४८ वर्षीय पुरूष, २० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे. लोणीदेवकर येथील २६ वर्षीय युवक, बळपुडी येथील ३० वर्षीय पुरूष, कुरवली येथील एकाच कुटुंबातील सात जणांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये ७५ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय महिला, ३९ वर्षीय पुरूष, ५८ वर्षीय पुरूष, ५२ वर्षीय महिला, ४३ वर्षीय महिला, १७ वर्षीय युवकाचा यामध्ये समावेश आहे. इंदापूर शहरातील अंबिकानगर येथील ४० वर्षीय महिला व नरुटवाडी येथील ३२ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे. बारामतीतील खासगी प्रयोगशाळेत देखील इंदापूर तालुक्यातील ४ जणांचा कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल आला आहे.










