इंदापूर : महान्यूज लाइव्ह
इंदापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसात म्हणजे 12 व 13 ऑगस्ट दरम्यान आलेल्या अहवालात एकूण 22 जण कोरोना बाधित आढळून आले असून एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील वडापुरी येथील 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान 12 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. 12 ऑगस्ट रोजी झालेल्या अहवालामध्ये कांदलगाव येथील 27 वर्षीय पुरुष, लुमेवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, इंदापुरातील कसबा भागातील सात वर्षीय मुलगा, 37 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, 12 वर्षीय मुलगा तसेच सराटी येथील 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा अहवाल कोरोना बाधित आढळला आहे.
काल आलेल्या अहवालात तरंगवाडी येथील 84 वर्षीय पुरुष, सरस्वतीनगर येथील 38 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय मुलगा व 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे, तर याच दिवशी इंदापुरातील दोन डॉक्टर कोरोना बाधित आढळून आले आहेत. आणि एकाच कुटुंबातील 27 वर्षीय मुलगा, 22 वर्षीय मुलगा, 40 वर्षीय महिला, 43 वर्षीय महिला, 23 वर्षीय युवक व 78 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
आलेल्या रुग्णांपैकी काही रुग्ण अकलूज येथे उपचार घेत आहेत तर इतर रूग्ण इंदापुरातील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहेत.










