बारामती : महान्युज लाईव्ह
आज बारामतीत नव्याने सात जण कोरोना बाधित आढळले आहेत. बारामती तपासणी झालेल्या परंतु इंदापूर तालुक्यातील दोन रुग्णांना देखील कोरोना ची बाधा झाली आहे.
कोरोना हा न्यायालयानंतर आता साखर कारखानदारीतही शिरला असून साखर कारखान्याच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये बारामती तालुक्यातील बोरकर वाडी येथील 80 वर्षीय पुरुष, सोमेश्वरनगर येथील 45 वर्षीय पुरुष, जगताप मळा येथील 21 वर्षीय महिला, झारगडवाडी येथील 27 वर्षीय पुरुष, पणदरे 40 वर्षीय पुरुष व महिला, देसाई इस्टेट येथील 48 वर्षीय पुरुष व त्यांचा 19 वर्षीय मुलगा यांचा समावेश आहे.
रॅपिड एंटीजन टेस्टमध्ये तब्बल 14 पॉझिटिव्ह; त्यापैकी दोघेजण आरटीपीसीआर टेस्ट मध्ये देखील पॉझिटिव्ह
दरम्यान रॅपिड एंटीजेन टेस्टमध्ये बारामती तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या व तपासणी केलेल्या रुग्णांपैकी तब्बल 14 जण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यापैकी दोघांची त्यानंतरची आरटीपीसीआर टेस्ट देखील पॉझिटिव्ह आलेली आहे, त्यामुळे शासकीय अहवालाव्यतिरिक्त 12 जण पॉझिटिव्ह दिसत आहेत.











