इंदापूर: महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्याची कोरोना पाठ सोडत नाही, कोरोना मुक्त झालेल्या सणसर मधील हिंगणेवाडीत पुन्हा एक कोरोनाचा रुग्ण सापडला असून हा रुग्ण अगोदर बारामती येथील तपासणीमध्ये निगेटिव्ह आला होता. याखेरीज निरनिमगाव व शेटफळगढे येथेही नव्याने रुग्ण आढळले आहेत.
इंदापूर तालुक्यात काल संशयित कोरोनाचे 44 जणांचे नमुने घेण्यात आले होते, त्यामध्ये फक्त तिघेजण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. अर्थात हिंगणेवाडी येथे आढळलेल्या नव्या कोरोनाग्रस्तांची तपासणी पूर्वी बारामती येथील रुई कोविड केअर सेंटर मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी तपासणीत ते निगेटिव्ह आढळले होते, त्यावरून कोरोनाच्या अगोदर तपासणीमध्ये निगेटिव्ह आढळले म्हणून हरखून जायची गरज नाही. त्या संशयिताने देखील स्वतःला 14 दिवस क्वारंटाईन सक्तीने करण्याची गरज आहे. दरम्यान शेटफळगडे येथे आढळलेला कोरोनाग्रस्त हा कारखान्याचा कामगार असून निर निमगाव येथेही नव्याने कोरोनाग्रस्त आढळून आला आहे. दरम्यान सणसर, भवानीनगर मध्ये काही संशयितांची तपासणी करण्यात आली होती, मात्र ते सर्व जण निगेटिव्ह आले आहेत.











