बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील निंबूत येथील एका कंपनीच्या कामगार वसाहतीतील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल पुण्यातील खासगी प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे आज बारामतीतील दिवसभरातील रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. तर बारामतीतील एकूण रुग्णसंख्या २१२ झाली आहे.
बारामतीत आज दुपारपर्यंत १८ जणांना कोरोनाची लागण झालेली होती. निंबूत येथील एका कंपनीच्या कामगार वसाहतीतील दोघांची पुण्यातील खासगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्या दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता बारामतीत दिवसभरात २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मागील काही दिवसांत बारामतीतील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच आता बारामतीतील टेस्टिंगची संख्याही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.










