बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील आमराई येथील ज्येष्ठ महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बारामती शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, बारामती तालुक्यातील कोरोना बळींची संख्या आज सहावर गेली आहे.
बारामती शहरातील आमराई येथील एका महिलेला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी या महिलेला बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कालपासून हे रुग्णालय शासनाने ताब्यात घेतले असून आज सकाळी या महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बारामती शहर आणि तालुक्यात पाचजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज सहावा बळी गेला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरीकांनी अधिकची दक्षता घेण्याची गरज व्यक्त होवू लागली आहे. प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात असून नागरीकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.











Very sad…
न्यूज पेपर कंपन्यांनी आणि उद्योजक मंडळीनी माेफत मास्क वाटप करायला हरकत नाही त्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळू शकेल…..