भोर : महान्यूज लाईव्ह
माणिक पवार
भोर तालुक्यातील विवाहित युवतीला वेळोवेळी शारीरीक, मानसिक छळ करून उपाशीपोटी ठेऊन घर बांधणेसाठी तसेच फर्निचर, भांडी आणणेसाठी वेळोवेळी पैशाची मागणी करून छळवाद केल्याप्रकरणी राजगड पोलिसांनी पुरंदर तालुक्यातील चांबळी येथील पतीसह सासू सासरे आणि नणंदवर गुन्हा दाखल केला आहे.
किरण शंकर कामठे (पती), सासरे शंकर लक्ष्मण कामठे, सासू आशा शंकर कामठे, व नणंद सर्व रा. मूळ रा. चांबळी ( ता. पुरंदर ) यांच्यावर राजगड पोलीस ठाण्यात छळवाद केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना २३ ते २८ मे दरम्यान वेळोवेळी कात्रज येथे घडली आहे. याबाबत विवाहित महिला सायली किरण कामठे वय २१ सध्या रा. वेळू ( ता. ) भोर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास राजगड पोलीस करत आहे.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी सायली हिचे किरण कामठे याच्याशी २३ मे २०२१ रोजी झाला होता. लग्न झाल्यानंतर काही काळाने सासरकडील सर्वजण कात्रज येथे राहण्यास आले होते. या काळात पती किरण हा सतत दारू पिऊन ‘तुझ्या बापाने काय दिले. कोरोनामध्ये लग्न करून दिल्यासारखे नुसते लग्न करून दिले. लग्नात सामान, फर्निचर, इतर साहित्य दिले नाही, तुला फुकट करून आणली. पती किरण याने विवाहितेला मारहाण करून तुझे आई वडीलांकडुन घर बांधण्याकरिता ५ लाख रुपये घेवून ये असे म्हणून रात्रीचे घराबाहेर हाकलून दिले. सासु सासरे व नणंद यांनी विवाहित युवतीला मानसिक, शारीरीक त्रास देवुन उपाशीपोटी ठेवुन वेळोवेळी मारहाण केली असून मूलबाळ होत नाही. तू निघून जा असे वांरवार म्हणून त्रास करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.











