फलटण : महान्यूज लाईव्ह
शितल अहिवळे
सातारा जिल्हा अँम्यूचर ॲथलेटिक्स असोसिएशन व फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन आणि फलटण जिमखाना, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रॉसकंट्री निवड स्पर्धा २०२१-२२ चे आयोजन उद्या दिनांक १९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७:३० वाजता, सजाई गार्डन, गिरवी नाका नजीक, फलटण जिल्हा सातारा येथे करण्यात आले आहे.
स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ. निता मिलिंद नेवसे, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. तर जिल्हा क्रॉसकंट्री निवड स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ, स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी सकाळी ९:०० वाजता फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दिपक राव चव्हाण, पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, जाधववाडी सरपंच सीमा आबाजी गायकवाड व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.











