मुंबई : महान्यूज लाईव्ह
इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत पाकिस्तानी रुपयाची प्रचंड घसरण झाली आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये एका डॉलरसाठी १२३ पाकीस्तानी रुपये मोजावे लागत होते. तर डिसेंबर २०२१ मध्ये १७७ पाकीस्तानी रुपये मोजावे लागत आहेत.
याच काळात भारतीय रुपयाचा विचार केला तर २०१८ एका डॉलरसाठी ७०.०९ रुपये लागत होते, ते २०२१ मध्ये ७५.३९ रुपये लागतात.
याच काळात एका डॉलरसाठी बांगलादेशचे टका चलन ८४ ते ८५.९ च्या आसपास द्यावे लागत होते.
वरील तुलनेवरून पाकीस्तानी रुपयाची झालेली प्रचंड घसरण लक्षात येईल. यापुर्वी पाकिस्तानच्या चलनाची सर्वात मोठी घसरण १९७१ ला बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हा झाली होती. त्यावेळी एका डॉलरला ४.६० पाकीस्तानी रुपये असणारा दर थेट ११.१० पाकीस्तानी रुपयावर गेला होता.
चलनातील या घसरणीने तिथे महागाई प्रचंड वाढलेली आहे.