महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
सध्या जगभरात ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टने धुमाकूळ घातला आहे. जगभरातील 40 हून अधिक देश या विषाणूच्या सावटाखाली आहेत. अनेक देशांमध्ये सध्या अंशतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये हा ओमीक्रॉन आहे तरी काय? अशी सध्या चर्चा सुरू आहे. त्यातही सध्या प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या असल्याने पालक काहीसे तणावाखाली आहेत. त्यांच्यासाठी…
सध्या दक्षिण आफ्रिका आणि युरोप मध्ये लागण झालेल्या ओमीक्रॉन विषाणूची जास्तीत जास्त रुग्ण संख्या ही लहान मुलांची असल्याचे सांगितले जात आहे. भारतात देखील सध्या लहान मुलांना कोरोनाचे लसीकरण झालेले नाही. अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी यासाठी तज्ञाकडून वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना येऊ लागल्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार ओमीक्रॉन तेवढा गंभीर नाही असे सांगितले जाते, मात्र त्याचा प्रसार अतिशय वेगाने होतो. भारतातील आरोग्य व्यवस्था लक्षात घेता रुग्ण संख्या वाढली की आरोग्य व्यवस्थेवर ताण येतो आणि हा आलेला ताण रुग्णांना मृत्यूच्या दारात घेऊन जातो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे याचा प्रादुर्भाव कमीत कमी रुग्णावर कसा होईल यावर लक्ष देण्याची गरज आहे.
ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णसंख्येत आढळून आलेल्या या लक्षणानुसार दक्षिण आफ्रिकेमध्ये अंगदुखी, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणे आढळली. त्याचप्रमाणे यापूर्वी आढळून आलेल्या डेल्टा व्हेरिएन्टनुसार चव आणि वासाबरोबरच घशामधील खवखव हीदेखील लक्षणे व ओमीक्रॉन मध्ये दिसून येत आहेत.
अधिक ताप, डोकेदुखी, घशातील खवखव, थकवा एक तासापर्यंत सतत खोकला येत राहणे भूक न लागणे अशी लक्षणे सध्या मुलांमध्ये दिसत आहेत. विशेषतः सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये लागण झालेल्या रुग्णसंख्येत लहान मुलांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जास्त जाणवत असून त्यांना जास्त काळ दवाखान्यामध्ये उपचारासाठी रहावे लागत आहे.