महान्यूज सोशल मिडिया टीम
ऑक्टोबर महिन्यात २० लाख भारतीय ग्राहकांचे व्हाटसएप कंपनीने बंद केले आहे. त्याअगोदर ३०.२७ लाख अकाऊंट नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बंद केलेले आहेत.
भारत सरकारच्या नव्या सोशल मिडियाबाबतच्या कायद्याप्रमाणे कंपनीला दर महिन्याला त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींवर त्यांनी काय कारवाई केली याची माहिती द्यावी लागते. त्यानूसार व्हाटसएपने ऑक्टोबरची माहिती जाहिर केली आहे.
व्हाटसएपचे जगात सर्वाधिक ग्राहक हे भारतात आहेत. अर्थातच या माध्यमाचा उपयोग मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती किंवा बातम्या पसरविण्यासाठीही होतो. यावर आळा घालण्यासाठीच कंपनीने काही नियम बनविले आहेत. या नियमांचे उल्लघन केल्यास आपले अकाऊंट बंद होऊ शकते.
जर तुम्ही खालील गोष्टी केल्या असतील तर तुमचेही अकाऊंट बंद होऊ शकते.
१. जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या नावे फेक अकाऊंट तयार केले.
२. तुमच्या कॉन्टक्ट लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीला जर तुम्ही मोठ्या प्रमाणात मेसेजेस पाठवत असाल.
३. तुम्ही WhatsApp Delta, GBEhatsApp, EhatsAppPlus सारख्या तिसऱ्याच प्लॅटफार्मवरून व्हाटसएपचा वापर करत असाल.
४. जर तुम्हाला खुप लोकांनी ब्लॉक केले.
५. जर खुप लोकांनी तुमच्या व्हाटसएप अकाऊंटबाबत तक्रारी केल्या.
६. जर तुम्ही मालवेअर किंवा तत्सम लिंक व्हाटसएपचा उपयोग करून पाठवत असाल.
७. तुम्ही जर पोर्न क्लिप्स, धमकीचे किंवा मानहानी करणारे मेसेज पाठवत असाल.
८. हिंसाचाराला उत्तेजन देणारी चुकीची माहिती पाठवली.
वरील कारणांवरू तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते. तरी व्हाटसएप वापरताना याची काळजी घ्या