मुंबई : महान्यूज लाईव्ह
ओमिक्रॉन कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढत असले तरी लगेचच कोणतेही निर्बंध घालण्याचा सरकारचा विचार नाही. परिस्थिती पाहून एक आठवड्यानंतर याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रसरकार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आताच निर्बंध कमी केले असून शाळाही सुरु केल्या आहेत. ज्या जिल्ह्यात शाळा सुरू नाहीत, त्यांनाही त्या सुरु करण्यास सांगितले आहे. कोरोना होऊ नये यासाठी मास्क, हातांची स्वच्छता, लसीकरण या गोष्टींवर भर दिला जात आहे. तसेच ओमिक्रॉनची लक्षणेही सौम्य आहेत असे सध्यातरी दिसते आहे. त्यामुळे तातडीने निर्बंध घालण्याचा विचार नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.