महाड : महान्यूज लाईव्ह
अलिबागच्या वलसोली बीचवर पॅरोसेलिंग करताना अचानक दोर तुटला आणि पॅरासेलिंग करत असलेल्या दोघी भर समुद्रात कोसळल्या. त्यांना समुद्रात पडताना पाहून त्यांच्या कुटुंबियांच्या काळजाचा ठोकाच चुकला. परंतू लाईफ जॅकेटमुळे दोघीही बचावल्या आहेत. २७ नोव्हेंबरला झालेली ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कोरोनाचे निर्बंध कमी झाल्याने पर्यटनस्थळी गर्दी होत आहे. अलिबागच्या बीचवरही पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. यामध्येच साकीनाका येथील काहीजण होते. त्यातील सुजाता नारकर आणि सुरेखा पाणीकर या दोन महिला पॅरासेलिंग करण्यासाठी गेल्या. मात्र पॅरासेलींगच्या वेळी आकाशात खुप उंचावर असतानाच अचानक दोर तुटला, आणि त्या समुद्रात कोसळल्या. त्यांनी लाईफ जॅकेट घातले असल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. बोटीवरील जीवरक्षकांनी दोघींनाही सुखरुप बाहेर काढले.
मात्र यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे.