बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती येथील इंडियन मेडिकल असोशिएशनच्या माध्यमातून डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बारामती आणि परिसरातील डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कोरोनाच्या लढ्याबरोबरच रक्ताच्या तुटवड्यातील संकटातही योद्धा म्हणून जबाबदारी पार पाडली.
या शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे, एम. ए महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर्स डेच्या निमित्ताने बारामतीच्या डॉक्टरांनी आयोजित केलेले रक्तदान शिबीर कौतुकास्पद असल्याचे मत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले.
बारामती येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित माणिकबाई चंदुलाल सराफ या रक्त पेढीने रक्त संकलन केले. आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अमरसिंह पवार, खजिनदार डॉ. सौरभ मुथा, मेडिकोज गिल्डचे अध्यक्ष डॉ. संजय पुरंदरे, महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी बापू भोई, डॉ. एम आर. दोशी. इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. आशुतोष आटोळे, डॉ. मोहन पाटील, डॉ. अविनाश आटोळे, डॉ.सोमनाथ राऊत, डॉ. प्रीतम ललगुनकर, डॉ. सुजीत अडसूळ आदी उपस्थित होते.
इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. अशोक दोशी, आयएमए बारामतीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी सोळुंखे, सचिव डॉ. संतोष घालमे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी मान्यवरांना इंडियन मेडिकल असोसिएशन बारामतीच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आले.











