मुंबई : महान्यूज लाईव्ह
नोव्हेंबर महिन्यात केंद्रसरकारला आजपर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. नोव्हेंबरमध्ये १.३२ लाख कोटी रुपये जीएसटी कराच्या रुपाने सरकारला मिळाले आहेत. जीएसटी कराची सुरुवात झाल्यापासूनची ही दुसऱ्या क्रमांकाची रक्कम आहे. यापुर्वी एप्रिल २०२१ मध्ये सरकारला १.४१ लाख कोटी जीएसटीमधून मिळाले होते.
नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली होती, त्याचा परिणाम जीएसटी कराचे उत्पन्न वाढण्यात झाला आहे. कोविडमुळे उद्भवलेल्या संकटातून आपण बाहेर पडत असल्याचेही हे लक्षण आहे असे याबाबत केंद्रीय अर्थखात्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हणले आहे.
सरकारने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते, त्याचाही परिणाम या जीएसटी उत्पन्न वाढीतून दिसून येत असल्याचे केंद्रसरकारने म्हणले आहे.