मुंबई : महान्यूज लाईव्ह
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले असून ते उद्या ( ता. ३ ) रोजी रात्रीपर्यंत ओरिसा आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण थायलंड आणि अंदमानचा समुद्र यावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे दिसून येत होता, त्याचे रुपांतर चक्रीवादळात झालेले आहे.
ओरिसामधील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तीव्र किंवा अतीतीव्र स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. ओरिसा येथे ४ डिसेंबर, पश्चिम बंगालमध्ये ५ डिसेंबरला तर ईशान्य भारतात ५ व ६ डिसेंबरला मोठ्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.