मुंबई : महान्यूज लाईव्ह
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ( सीएए ) , राष्ट्रीय नागरिक रजिस्टर ( एनआरसी) या शब्दांचा भारताच्या राजकारणात प्रवेश झाल्यानंतर भारतीय नागरिकत्व या शब्दालाही मोठे महत्व प्राप्त झाले. याच विषयावर आज केंद्रसरकारने लोकसभेत मोठी मनोरंजक माहिती दिली.
गेल्या पाच वर्षात ८७ देशातील एकुण १०६४६ लोकांनी भारताचे नागरिकत्व मागितले आहे. यामध्ये पहिला नंबर पाकिस्तानचा आहे, जेथील ७७८२ जणांनी ही मागणी केली आहे. दुसरा नंबर बांगलादेशाचा आहे, जेथील १८४ जणांची ही मागणी आहे. पण जर पाचऐवजी दहा वर्षाचा विचार केला तर बांगलादेशातील नागरिक पहिल्या नंबरवर येतात. या कालावधीत १५,१७६ बांगलादेशींनी भारताचे नागरिकत्व मागितले.
पण याउलट भारताचे नागरिकत्व सोडणाऱ्याची संख्या याहून खुप जास्त आहे. गेल्या पाच वर्षात ६ लाखाहून जास्त लोकांनी भारताची नागरिकता सोडलेली आहे. २०१७ मध्ये १,३३,०४९, तर २०१८ मध्ये १,३४५६१, सन २०१९ मध्ये १,४४,०१७ लोकांनी भारताची नागरिकता सोडली. २०२० मध्ये ८५२४८ तर २०२१ मध्ये आजपर्यंत १,११,२८७ लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे.
केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेतील सीएए आणि एनआरसी बाबत सविस्तर निवेदन करताना ही माहिती दिली.