
उर्वरित 54 जण निगेटिव्ह
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस मध्ये दोन प्रसिद्ध डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे काल निष्पन्न झाले होते, या डॉक्टर च्या संपर्कातील 56 पैकी दोन महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे.
काल आरोग्य प्रशासनाने घेतलेल्या 56 जणांचा कोरोनाचा अहवाल आता संध्याकाळी उशीरा आला. त्यामध्ये दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाँ. अशोक रासगे यांनी दिली. केडगाव येथील कोरोना बाधीत डॉक्टरांच्या संपर्कात आल्याने अगोदरच पाटस येथील प्रसिद्ध डॉक्टर दांपत्य कोरोनाबाधित झाले होते. आता यांच्या संपर्कातील 56 पैकी दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
काल आरोग्य विभागाने कोरोनाबाधीत डाॅक्टरांच्या कुटुंबातील व्यक्तींसह संपर्कातील रूग्ण, रूग्णालयातील कर्मचारी असे सुमारे ५६ जणांची नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.दुसरीकडे आज पुन्हा या रूग्णालयाच्या व डॉक्टरच्या संपर्कातील आणखी १७ जणांचे कोरोना चाचणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत.










