दूधगंगा संघाच्या अवसायानाच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती, राज्यमंत्र्याकडून संघास जाणीवपूर्वक अडथळ्याचा हर्षवर्धन पाटील यांचा आरोप
इंदापूर: महान्यूज लाईव्ह
दुधगंगा दूधगंगा संघाच्या अवसायनाच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. दरम्यान दुध गंगा संघ हा सहकारी तत्त्वावरील असून, तो चालू राहू नये या भावनेने राजकारण केले जात असून रात्रीच्या 11- 11 वाजता निर्णय घेऊन इंदापूरचे राज्यमंत्री मंत्रिपदाचा वापर करून अमूल च्या इंदापुरातील आगमनामध्ये अडथळे आणत आहेत असा आरोप माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
सहकार खात्याने दूधगंगा संघाच्या संदर्भात दिलेल्या अवसायानाच्या अंतरिम आदेशाला उच्च न्यायालयाने 23 जून रोजी पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. या आदेशास ची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी वरील टीका केली.
ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालकीच्या असलेल्या दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाविरोधात तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेली भूमिका निंदनीय व शेतकरीविरोधी तसेच सहकार चळवळीच्या विरोधात आहे. देशातील अग्रगण्य अशा व जगात सर्वाधिक निर्यात होत असलेल्या अमोल इंदापूरच्या दूधगंगा संघाने करार केलेला आहे हा करार केलेला लोकप्रतिनिधींना पहावत नाही, 8 जून पासून त्याचे संकलन सुरू होताच दूधगंगा संघाच्या कामात अडथळे जाणीवपूर्वक आणले गेले. दूधगंगा सुरू होऊच नये यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांवर दबाव आणला. तालुक्याच्या राज्यमंत्र्यांकडील दुग्ध व्यवसाय विकास खात्याने दूधगंगा संघाला 16 जून रोजी गडबडीत रात्री 11.05 मिनिटांनी गैरलागू कारणे नमूद करून व सहकारातील नियमांची प्रक्रिया बाजूला ठेऊन अवसायानाची अंतरीम नोटीस दिली. आम्ही त्यास कायदेशीर असे उत्तर दिले आहे. शासनाची नोटीस चुकीचे असल्याने न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे.
दूधगंगा संघाकडून 20 जून पर्यंत संकलित दुधाचे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत. दुधगंगा संघाने अमूलशी करार केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. मात्र मंत्रिपदावर असलेले लोकप्रतिनिधी राजकीय हेतूने शेतकरी हिताच्या विरोधी भूमिका घेत संघास विरोध करीत आहेत. मात्र शासनाचे कामकाज हे नियमानुसार चालते, एखाद्या व्यक्तीच्या आकसापोटी चालत नाही असे पाटील म्हणाले.
यावेळी इंदापूर बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, दूध संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील, उपाध्यक्ष उत्तम जाधव, उदयसिंह पाटील, लालासाहेब पवार, कृष्णाजी यादव, भरत शहा, विलास वाघमोडे, देवराज जाधव, कांतीलाल झगडे, महेद्र रेडके,संजय देहाडे, दीपक जाधव, नानासाहेब शेंडे,पराग जाधव, पिंटू काळे, निलेश देवकर, दत्तात्रय शिर्के, वसंत मोहोळकर, आबासाहेब शिंगाडे, कैलास कदम, सुभाष काळे, रघुनाथ राऊत आदी उपस्थित होते.-










