बारामती : महान्यूज लाईव्ह
कोऱ्हाळे बुद्रूक येथील ९० वर्षीय ज्येष्ठ नागरीकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यात या रुग्णावर उपचार सुरु असताना काल रात्री त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या ज्येष्ठ नागरीकाच्या कुटुंबातील अन्य तिघांनाही कोरोनाची लागण झाली असून हा परिसर प्रशासनाने २८ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
कोऱ्हाळे बुद्रूक येथील ९० वर्षीय ज्येष्ठ नागरीकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबिय व संपर्कात आलेल्या तब्बल सतरा लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या पत्नीसह नात आणि नातसून यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासन पुरते हादरले असतानाच या ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.










