इंदापूर : महान्युज लाईव्ह
आज इंदापुर मध्ये नव्याने कोरोनाचा रुग्ण आढळला. सोलापुर हून इंदापुरात आलेल्या एका कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र त्यामुळे कोरोनामुक्त इंदापूर केल्यानंतर पुन्हा इंदापुरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने आरोग्य खाते सतर्क झाले आहे.
आज आलेला रुग्ण हा सोलापूर येथील निवासी असून तो काही दिवसापूर्वी इंदापूर ते आला होता. अर्थात सोलापूरमध्ये त्याची कोरोनाची चाचणी झाली होती. तेव्हा ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतर हा रुग्ण इकडे राहण्यास आला, मात्र दोन दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्याची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. इंदापूर दर्गाह मस्जिद चौक परिसरातील हा रुग्ण असून त्यांच्या निकटच्या संपर्कातील पंधरा जणांची ही कोरोनाची चाचणी करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरवासियांना घाबरून जाऊ नका, दक्षता घ्या, हा रुग्ण सोलापूर येथील असल्याने आजपर्यंत शहर कोरोनामुक्त होते, तसेच ते ठेवायचे असून जरी आता एक रुग्ण आढळला असला, तरी सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.










