दौंड शहरातील पहिला रूग्ण कुटुंबासह कोरोना मुक्त, प्रशासनाने केले स्वागत
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरात १६ मे रोजी पहिला कोरोनारुग्ण आढळला. हा ८२ वर्षीय कोरोनाचा रुग्ण आज कोरोनामुक्त झाला. फक्त ते एकटेच नाही, तर त्यांच्या ७५ वर्षीय पत्नी व २० वर्षाच्या नातीनेही कोरोनावर मात केली.
कोरोनाला ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक बळी पडत असल्याची चर्चा वैद्यकीय तज्ज्ञांमध्येही सुरू असतानाच दौंडमधील एक नव्हे तर दोन ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनावर मात केली. आज दौंडमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले.
दौंडमध्ये १६ मे रोजी चहाचा व्यवसाय असलेल्या या ज्येष्ठ नागरिकास कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले होते. त्यांना पुण्यास उपचारासाठी हलविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची व या दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांची कोरोना चाचणी प्रशासनाने केली होती. त्यामध्ये त्या रुग्णाच्या पत्नी व नातीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हे दोघे दौंडमधील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते.
दरम्यान दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे व आरोग्य विभागाने त्यांचे स्वागत करतानाच आणखी १४ दिवस घरात विलगीकरणाच्या सूचना दिल्या आहेत.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=165312295011578&id=111857893690352










