भारतात १ लाख ३९ हजार रुग्ण, इराणला टाकले मागे
मुंबई : महान्यूज लाईव्ह
कोरोनाचा गुणाकार आम्ही रोखण्यात यशस्वी झालो आहोत असे भलेही विविध राज्यांची आरोग्य मंत्र्यालये व खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्रालय सांगत असले तरी आजच्या आकड्याने साऱ्यांनाच हैराण केले आहे. आज भारत जगातील सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या देशांच्या यादीत १० व्या स्थानावर पोचला. आज इराणला भारताने मागे टाकले. जुलैपर्यंत भारतात ६ लाखांवर कोरोनाबाधित असतील या आकड्याने केंद्र सरकारलाही संकटात टाकले आहे.
कोरोनाचा गुणाकार वेगाने वाढत असून महाराष्ट्राने आज ५० हजार बाधितांचा आकडा ओलांडला. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्याही १.३८ लाखांवर पोचली. त्यामुळे आता भारत कोरोनाच्या बाबतीत जगाच्या नकाशावर दिसू लागला आहे. शनिवारपर्यंत इराण १० व्या क्रमांकावर होता. रविवारी मात्र भारताने इराणला मागे टाकले. भारतात ४ हजार २४ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने विविध राज्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्याने आता यापुढील काळात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिकच वाढणार आहे. भारतात वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेऊन सरकारने ७ लाख १४ हजाराएवढ्या रुग्णशय्यांची संख्या वाढवली आहे.
अमेरिका, ब्राझील, रशिया, इंग्लड, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी व तुर्कस्थाननंतर आता भारताचा क्रमांक १० वा लागला आहे. सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या अमेरिकेत १६ लाख ४३ हजार ४९९ असून ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये ही संख्या ३ लाख ६३ हजार २११ एवढी आहे. या सर्वांचा विचार करता येणाऱ्या काही दिवसांत भारत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत हळूहळू येत्या काही दिवसांतच टॉप फाईव्हमध्ये जाण्याची चिन्हे आहेत. कारण भारतात दररोज सहा हजारांवर रुग्ण वाढत आहेत. ही रुग्णवाढीची संख्या
जगातील प्रमुख दहा देशांची कोरोनाग्रस्तांची संख्या
अमेरिका – १६ लाख ४३ हजार ४९९
ब्राझील – ३ लाख ६३ हजार २११
रशिया – ३ लाख ४४ हजार ४८१
इंग्लड – २ लाख ६० हजार ९१६
स्पेन – २ लाख ३५ हजार ७७२
इटली – २ लाख २९ हजार ८५८
फ्रान्स – १ लाख ८२ हजार ७०९
जर्मनी – १ लाख ८० हजार ३२८
तुर्कस्थान -१ लाख ५६ हजार ८२७
भारत – १ लाख ३९ हजार ४९










